एसटी कर्मचारी संघटना अद्यापही संपावर ठाम

0

रत्नागिरी : सोमवारपासून कर्मचाऱ्यांनी हजर व्हावे तरच निलंबन मागे घेण्यात येईल, असे आवाहन एसटी महामंडळाने केले होते. मात्र, या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नसून, सोमवारी संप मागे घेण्याची शक्यता नाही. दि. २० डिसेंबरनंतर निर्णय घेण्यात येईल, अशी चर्चा आता रत्नागिरीतील एस.टी. कर्मचाऱ्यांमध्ये सुरू होती. त्यामुळे आणखीन काही दिवस संप सुरूच राहणार असल्याचे चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत २० टक्के एसटीचे वेळापत्रक सुरु आहे, तर ३२७ निलंबनापैकी २० कर्मचारी हजर आहेत. महिना संपला तरी एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा विषय मिटत नाही. एसटी आज सुरु होईल, उद्या सुरु होईल या आशेवरच प्रवासी आहेत. मात्र, आता एसटी कर्मचाऱ्यांच्या या धोरणामुळे प्रवासी वर्गही संतापला आहे. पगार वाढला पाहिजे, या मताशी प्रवासीही सहमत आहेत. मात्र, पगारवाढीनंतरही संप मागे घेतला जात नाही. एस.टी.चे शासनात विलीनीकरण शक्य नसल्याचे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीने स्पष्ट केले. गेले महिनाभर सर्वसामान्य लोकांपासून शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून, या बाबत एसटी कर्मचारी संघटनांनी समजस्याने तोडगा काढण्याऐवजी विषय अधिक वाढत जात आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी आंदोलन मागे घ्या, निलंबनाची कारवाईदखील मागे घेण्यात येईल. त्यासाठी सोमवारी हजर होण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, अद्यापही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे सोमवारी तर संपातील बहुतांश कर्मचारी हजर होतील, असे वाटत असतानाही या प्रयत्नांनाही अपयश येत असल्याचे चित्र आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:08 AM 13-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here