आंगणेवाडी येथील भराडी मातेचा यात्रोत्सव २४ फेब्रुवारीला

0

मसुरे : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिकोत्सव २४ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे. यात्रेची तारीख आंगणे कुटुंबीयांनी जाहीर केली आहे. गेल्या दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर या यात्रोत्सवास भाविकांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. देश-विदेशातील श्री भराडी देवीच्या भक्तांना उत्सुकता असते ते देवीच्या वार्षिकोत्सवाची अर्थात जत्रोत्सवाची. रविवारी सकाळी देवीचा कौल घेऊन देवीच्या हकमाने ही तारीख ठरविण्यात आली आहे. एकदा निश्चित झालेली तारीख कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही हेसुद्धा आंगणेवाडी यात्रेचे वैशिष्ट्य आहे. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेला यात्रोत्सव केवळ आंगणे कुटुंबीयांनी मर्यादित स्वरूपात साजरा केला होता. देश-विदेशात असलेले देवीचे लाखो भक्त या एका दिवसासाठी आंगणेवाडीत येऊन देवीचे दर्शन घेतात.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:55 PM 13-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here