जिल्ह्यात आज नव्या कोरोनाबाधिताची नोंद नाही

0

रत्नागिरी : जिल्ह्यात आज एकाही नव्या कोरोनाबाधिताची नोंद झाली नाही. तर, सात रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या घटून २१ आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७९ हजार ११४ एवढीच आहे. आज सात रुग्ण करोनामुक्त झाल्याने आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ६०४ एवढी आहे. कोरोनामुक्तांची टक्केवारी ९६.८३ आहे. जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेले नमुने – २७१, रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या नमुने २०१. सर्व ४७२ अहवाल निगेटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ४६ हजार ३३० जणांची कोरोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या २१ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ९, तर लक्षणे असलेले १२ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ९, तर संस्थात्मक विलगीकरणात १२ जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ७, तर डीसीएचमध्ये ५ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. बाधितांपैकी ५ जण ऑक्सिजनवर असून, दोन रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २४८९ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. या आठवड्यात तो ३.१५ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७४, चिपळूण ४७८, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८२९, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २४८९).

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या तपशिलानुसार काल कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाची ४ सत्रे पार पडली. त्यात १३७ जणांनी पहिला, तर २२९ जणांनी दुसरा डोस घेतला. काल एकूण ३६६ जणांचे लसीकरण झाले. कालपर्यंत जिल्ह्यातील ९ लाख ८५ हजार १८७ जणांचा पहिला, तर ५ लाख ५० हजार ९३६ जणांचे दोन्ही डोसेस घेऊन झाले आहेत. एकूण १५ लाख ३६ हजार १२३ जणांचे लसीकरण जिल्ह्यात पार पडले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
8:07 PM 13-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here