चरवेली येथे भीषण अपघातात वृद्धेचा मृत्यू

0

मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील चरवेली येथे रिक्षा व कारची समोरासमोर धडक होऊन रिक्षातील वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. मृत महिलेचा रिक्षाचालक मुलगा गंभीर जखमी आहे. हा अपघात शुक्रवारी दुपारी १२.१५ च्या दरम्यान झाला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा ही इंदवटी (ता. लांजा) येथून रत्नागिरीला चालली होती. त्यातून चालक राजेश बाळकृष्ण पवार (वय ३६) हे आपली आई लक्ष्मीबाई बाळकृष्ण पवार (वय ७५) यांना घेऊन रत्नागिरीला दवाखान्यात चालले होते. चरवेलीजवळ या रिक्षाची कारशी धडक होऊन हा अपघात घडला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here