बूस्टर डोससाठी मार्गदर्शक तत्त्वे नाहीत; सध्या संपूर्ण लसीकरणाला प्राधान्य : केंद्र सरकार

0

नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं संपूर्ण जगाची धाकधुक वाढवली आहे. अशातच भारतात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना बूस्टर डोस देण्याबाबतची भूमिका केंद्र सरकारने स्पष्ट करावी असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र सरकारला दिले होते. त्यावर केंद्र सरकारने आज न्यायालयात आपली बाजू स्पष्ट केली. “कोविड-19 लसीच्या बूस्टर डोससाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाचे सध्याचे प्राधान्य संपूर्ण पात्र लोकांना दोन डोससह संपूर्ण लसीकरणाला आहे. असे केंद्राने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले. ज्यांना कोविड-19 विरोधी लसीचे दोन्ही डोस दिले आहेत त्यांना बूस्टर डोस देण्याबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्राला दिले होते. यावेळी दुसऱ्या लाटेसारखी परिस्थिती नको, असे न्यायालयाने म्हटले होते. त्यावर केंद्राने आज न्यायालयात आपली भूमिका स्पष्ट केली. “राष्ट्रीय टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन आणि राष्ट्रीय एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-19 यांनी आतापर्यंत बूस्टर डोससाठी कोणतीही अपेक्षित मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत.” असेही केंद्राने न्यायालयाला सांगितले. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्याने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, “केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही. जगभरातील शास्त्रज्ञ या व्हायरससंदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच लसीकरणाबाबतचे निर्णय विज्ञान आणि वैज्ञानिक निकशांच्या आधारावर घेतले जातात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, आतापर्यंत या व्हायरसबाबत मिळालेली माहिती पुरेशी नाही. याबाबत अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच लसीचा आणखी एक डोस किंवा बुस्टर डोस डोस द्यावा की, नाही? याबाबतही ठामपणे काहीच सांगणं अशक्य आहे. लस किंवा उपचाराबाबत असे निर्णय सर्व पैलू, वैज्ञानिक पुरावे, संशोधन लक्षात घेऊन घेतले जातात.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:36 PM 14-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here