‘इन्फिगो’, गगनगिरी महाराज भक्तमंडळातर्फे नेत्रतपासणी शिबिर

0

रत्नागिरी : ‘इन्फिगो आय केअर’, रत्नागिरी आणि प.पू. गगनगिरी महाराज भक्त मंडळ कर्ला यांच्यातर्फे दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत मोफत नेत्रतपासणी शिबिर गगनगिरी महाराज आश्रमात आयोजित केले आहे. थिबा पॅलेस येथील गगनगिरी महाराज आश्रमात दि. १७ ते १९ डिसेंबर या कालावधीत आश्रमाचा वर्धापन दिन आणि श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याच दरम्यान सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उत्सवाचे औचित्य साधून मोफत नेत्रतपासणी शिबिर गगनगिरी महाराज आश्रमात होणार आहे. यावेळी डोळ्यांचा अंतर्भाग व बाह्य भागाची तपासणी, इंट्राऑनक्युलर प्रेशरची मोजणी, डोळ्यांच्या पडद्याची तपासणी, मोतिबिंदू व काचबिंदूचे परीक्षण, चष्म्याचा नंबर, संगणक वापरामुळे होणाऱ्या परिणामांची तपासणी केली जाणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी मठाचे व्यवस्थापक राम पानगले किंवा प्रवीण जोशी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:16 PM 14-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here