भारतीयांच्या सुटकेस चीनकडून जाणीवपूर्वक विलंब?

0

चीनला वैद्यकीय मदत घेऊन गेलेले आणि तेथे अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी गेलेले विशेष भारतीय विमानाच्या उड्डाणास परवागी देण्यास चीन प्रशासन जाणविपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत आहे. चीनला मदत घेऊन गेलेल्या या विमानातून तेथे उरलेल्या भारतीयांना परत आणले जाणार आहे. मात्र, या विमानाला उड्डाणासाठी विमानतळ प्राधिकरण आणि चीन प्रशासनाकडून अद्याप परवानगी मिळाली नाही. कोरोना विषाणूंच्या साथीवर मात करण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न करणाऱ्या चीनच्या राष्ट्राध्यक्षांना भारतीय जनता आणि सरकारच्या वतीने पंतप्रधान मोदी यांनी पत्र लिहले. भारत सरकार आणि जनतेकडून मदत हवी असेल तर आम्ही करण्यास तयार आहोत, असे कळवले. त्यानुसार चीनला ही मदत पाठवण्यात आली. भारत आणि चीनच्या राजनैतिक संबंधांना 70 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही मदतीची भेट पाठवण्यात आली. या वस्तू आणि औषधांचा भारतात तुटवडा असतानाही शेजाऱ्यांना मदत करण्याच्या आपल्या मुल्यांचे जतन करण्यासाठी ही मदत पाठवण्यात आल्याचे भारताने स्पष्ट केले. चीनने कळवल्यानुसार ग्लोव्हज, सर्जिकल मास्कस फिडींग, इन्फ्यूजन पंपस्‌ आनि डिफिब्रिलेटर्सचा त्यात समावेश होता. भारतीय विमानाला उड्डाण करू देण्यास चीन प्रशासन विलंब करत असल्याचा आरोप चीनने फेटाळला आहे. वुहानमध्ये अनेक भारतीय त्यांच्या सुटकेसाठी विमानाची दीर्घकाळ वाट पहात आहेत. या विलंबामुळे मोठ्या मानसिक त्रासाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. फ्रान्स अन्य काही देशातून आपल्या नगरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले जात आहेत. मग चीन प्रशासन मदत घेऊन येणाऱ्या विमानला क्‍लिअरन्स देण्यात विलंब का लावत आहे? भारताने पाठवलेली मदत हे आपला पाठींबा म्हणून ते गृहीत धरत नाहीत का? वुहानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी ते का आडकाठी करत आहेत. आमच्या नागरिकांना मानसिक आणि शारीरिक क्‍लेष का सहन करावे लागत आहेत,असे सवाल केले जात आहेत. भारतीय हवाई दलाचे सी – 17 ग्लोबमास्टर हे सर्वात मोठे विमान पाठवण्याचा निर्णय भारताने 17 फेब्रुवारीला जाहीर केला. त्यातून वैद्यकीय मदत पाठवण्यात येईल आणि परतताना उरलेले सर्व भारतीय नगरिक घेऊन येईल, असे जाहीर केले होते. यापुर्वी एअर इंडियाच्या दोन विमानातून 647 भारतीयांना परत आणण्यात आले आहे. शुक्रवारी चीनच्या परराष्ट्रमंत्रालयाच्या बैठकीत भारतीयांच्या सुटकेसाठी चीन सरकार मदत करत असल्याचे म्हटले आहे. उर्वरित 80 भारतीयांच्या सुटकेसाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न केले जात आहेत. चीनच्या बाजूने उड्डाणास उशीर केला जात आहे असे नाही. देशांत अडकलेल्या सदर्व परकीय नागरिकांच्या सुटकेसाठी चीन सरकार सर्वोच्च प्राधान्य देत आहे, असे चीनने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here