रत्नागिरी शहर व त्याचा परिसर एवढेच मर्यादित उद्दीष्ट सध्या समोर ठेवून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनच्या माध्यमातून ‘अथांग’ या नावाने एक कोकण टुरिझम कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यात आले आहे. शनिवार २२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास हॉटेल लँडमार्कच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये या परिषदेचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्या हस्ते होत आहे. या परिषदेला महाराष्ट्र व राज्याबाहेरून टूर ऑपरेटर्स, ट्रॅव्हल एजंट येत असून या क्षेत्रातील विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. रविवार २३ फेब्रुवारी रोजी हॉटेल व्यंकटेश एक्झिक्युटिव्ह येथे संपूर्ण दिवसभर ही परिषद चालेल. नोंदणीकृत सदस्यांनाच फक्त प्रवेश असेल.
