रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेकडून लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त येथील गोदुताई जांभेकर महिला विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त पतिसाद मिळाला असून पाचवी ते सातवी आणि आठवी ते नववी या दोन गटातून आठ विजेत्यांना रोख रक्कम आणि पमाणपत्र देवून परिषदेकडून गौरविण्यात आले. मराठी पत्रकार परिषदेच्या या अनोख्या उपकमाचे शाळेकडून कौतुकही करण्यात आले.
वक्तृत्व स्पर्धेपूर्वी येथील टिळक आळीतील लोकमान्य टिळक स्मारक येथे भेट देवून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर येथील गोदुताई जांभेकर विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारीत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत बहुतांश पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. गौरव नवेले, मंजिरी सावंत,गौरी संतोष शेलार, धनश्री किसन गवळी, सानिका मुरकर, लक्ष्मी सुरेश नंदाणे आदी विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, पमाणपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष हेमंत वणजू, तालुकाध्यक्ष राजेश शेळके, उपाध्यक्ष भालचंद्र नाचणकर, सचिव आनंद तापेकर, जान्हवी पाटील, जमिर खलफे, पशांत हर्चेकर आदी उपस्थित होते.

शाळेचे मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी पस्तावना करताना मराठी पत्रकार परिषदेने घेतलेल्या या उपकमाचे कौतुक केले. पत्रकारांच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपकमामुळे निश्चितच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पोत्साहन मिळेल. यानंतरही अनेक उपकमांसाठी शाळा परिषदेला सहकार्य करेल असा विश्वास चव्हाण यांनी व्dयक्त केला.
यावेळी विजेत्या स्पर्धकांपैकी मंजिरी सावंत व गौरी शेलार यांनी आपले लोकमान्य टिळक या विषयावर भाषण केले. उपस्थित पदाधिकाऱयांची ओळख पत्रकार जान्हवी पाटील यांनी करून दिली तर या कार्यकमाचे निवेदन शिक्षिका शुभांगी अभ्यंकर यांनी केले. यावेळी शिक्षक पौराणिक, वाघमोडे आदी उपस्थित होते.
