दापोली : हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन पावलेल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह अन्य मृत्युमुखी पडलेल्यांना दि. १५ डिसेंबर रोजी दापोलीत नागरिकांच्यावतीने आदरांजली वाहण्याच्या कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी ५ वाजता दापोली पोलिस ठाण्याच्या आवारातील परेड ग्राऊंडवर नियोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला तमाम दापोलीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दापोलीतील पत्रकारांच्या पुढाकाराने आयोजित केला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:29 AM 15-Dec-21