टीम इंडिया ग्रहणाच्या वाटेवर!

0

ट्वेंटी-20 मालिका 5-0 अशा फरकाने दिमाखात जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला वन डे मालिकेत 3-0 अशा फरकाने सपाटून मार खावा लागला. भारत व न्यूझीलंड यांनी प्रत्येकी एक मालिका जिंकल्यामुळे कसोटी मालिका रंगतदार होणार याचे संकेत मिळाले. मात्र वेलिंग्टन येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी यजमान न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी वर्चस्व राखले. भारताचे फलंदाज एकामागोमाग एक असे अपयशी ठरत असतानाच उपकर्णधार अजिंक्य रहाणे (38 धावा) याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. आता मराठमोळा अजिंक्य रहाणे रिषभ पंत (10 धावा) याच्यासोबत खेळपट्टीवर उभा असून पाहुण्या संघाने 5 बाद 122 धावा केल्या आहेत. पावसाच्या व्यत्ययामुळे 55 षटकांचाच खेळ होऊ शकला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here