दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने महिमत गडावर श्रमदान

0

संगमेश्वर : तालुक्यातील निगुडवाडी येथील महिमत गडावर दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने श्रमदान मोहीम घेण्यात आली. या मोहिमेत एकूण 22 दुर्गवीरांनी सहभाग घेतला. दुर्गवीर प्रतिष्ठनच्या वतिने महीमत गड संवर्धनासाठी घेण्यात आला आहे.
यापूर्वी 5 श्रमदान मोहीम यशस्वी झाल्या आहेत. देवरुखहून 22 दुर्गवीरांनी गडाकडे प्रयाण केले. गडावर पोहचल्यानंतर सर्वप्रथम गडाच्या पश्चिमेकडील बुरुजावर वाढलेली झाडी तोडुन बुरुज मोकळा करण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवगित गात गडाच्या पूर्व दिशेकडील बुरुजांवर जातांना मध्येच एक छोटा बुरुज आहे, त्या बुरुजांवरील झाडी तोडून स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे या बुरुजाने मोकळा श्वास घेतला. त्यानंतर गड फेरी पूर्ण करीत गडावरील उंच ध्वजस्तंभाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला. दुर्गवीर प्रतिष्ठानच्या कार्याबाबत उपस्थित दुर्गवीरांनी माहिती दिली आणि पुढील मोहिमेचे नियोजन करण्यात आले. मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने वेळोवेळी होत असलेल्या श्रमदान मोहिमांनी प्रेरीत होऊन कुंडी गावांतील स्थानिक 9 तरुणांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. अतिवृष्टीमुळे गडाच्या रस्त्यांवर 3 ठिकाणी मोठ्या दरडी कोसळल्या होत्या. त्यामुळे गडाच्या पायथ्याशी गाडीने पोहचता येत नव्हते. त्यामुळे या मोहिमेदरम्यान रत्नागिरी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने यांनी दरडी बाजूला करण्यासाठी जेसिबी उपलब्ध करून दिला. दरड हटवण्याच्या कामात अजय सावंत व राजेश सावंत यांनी सहकार्य केले. श्रमदान मोहिमेत अजय सावंत, सौरभ सावंत, सौरभ मांजरेकर, कुमार सरवदे, निशांत जाखी, मंगेश शिवगण, प्रितिश सावंत, गितेश गोंधळी, साहिल मांजरेकर, रोशन सावंत, रोहीत बालडे, प्रणव रावणंग, राकेश इंदुलकर, राजेश सावंत, संदीप माळवदे, शिवम सावंत, अनिकेत सावंत, अमित कदम, नितीन लाड, संदेश शेट्ये, नाना आंबेकर, हर्षद सनगले सहभागी झाले होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:22 PM 15-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here