‘रुपाली पाटील यांनी राजकीय आत्महत्या केली’; मनसेचंही प्रत्युत्तर

0

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष रुपाली पाटील-ठोंबरे यांनी आपला सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर, आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपल्या राजीनाम्याचं वैयक्तिक कारण असल्याचं स्पष्ट केलं. तसेच, स्वत:मध्ये बदल व्हावा, यासाठीच आपण मनसेला रामराम केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पाहून राजकारणात आले. मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही. ती माझी वृत्ती नसल्याचे पाटील यांनी सांगितले. राजीनामा देण्याआधी माझ्या मनातील खदखद राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवली आहे. पक्षातील रिकामटेकड्या नेत्यांकडून आपल्याला त्रास होत असल्याचे मला हा निर्णय घ्यावा लागला, अशी कबुली देखील रुपाली पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. रुपाली पाटील यांच्या या विधानावर मनसेचे पुणे शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. रुपाली पाटील यांच्या जाण्यानं मनसेला खिंडार वैगरे पडलेलं नाही. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर रुपाली पाटलांनी राजकीय आत्महत्या केली आहे. रुपाली पाटील- ठोंबरे यांचा राजीनामा द्यायचाच होता. हा सगळा त्यांचा प्री-प्लॅन आहे. तसेच रुपाली पाटील यांनी रिकामटेकडे कोण हे त्यांनी एकदा जाहीर करावं असं, आव्हानही वसंत मोरे यांनी दिले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:30 PM 15-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here