टिआरपी येथील अपघातात त्या जखमी पोलिसाचा अखेर मृत्यू

0

काही दिवसांपूर्वी टिआरपी येथील गॅस पंपासमोरील गतिरोधकावरुन स्वतःहून दुचाकीवरुन पडून जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा शुक्रवारी उपचारांदरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. बाजीराव बापू परीट (५०,सध्या रा. कारवांचीवाडी मुळ रा. सांगली) असे मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. गुरुवारी रात्री ते आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन कारवांचीवाडी ते जिल्हा शासकीय रुग्णालय असे कामानिमित्त येत होते. दरम्यान हा अपघात घडला होता. त्यांना उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here