साळवी स्टॉप येथील साई सिद्धालयात १८ डिसेंबरपासून श्री साई समाराधना उत्सव

0

रत्नागिरी : अखंड सौभाग्यवती सुमित्रामाई दत्ताजी कदम प्रतिष्ठानच्या ओम साई सिद्धालय, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे दि. १८ ते २० डिसेंबर २०२१ या कालावधीत श्री साई समाराधना उत्सव आयोजित केला आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. उत्सवात सर्व भक्तांना कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक राहील. उत्सवानिमित्त शनिवारी दि. १८ डिसेंबर रोजी दत्तजयंती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यानिमित्त सकाळी ९.३० ते ११ वा. दुग्धाभिषेक, महापूजा, हवन व आरती, दुपारी १ ते २.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ वा. जय भवानी महिला भजनी मंडळ, माळनाका यांचे भजन, सायं. ७ वाजता आरती, प्रार्थना व खिचडी प्रसाद. रविवार, दि. १९ रोजी सकाळी ९.३० ते ११ वा. नऊ धान्यांचा अभिषेक, महापूजा, हवन व आरती, दुपारी १ ते २.३० वा. महाप्रसाद, सायं. ४ वाजता बागेश्री महिला भजन मंडळ, मारुती मंदिर यांचे भजन, सायं.७ वाजता आरती, प्रार्थना व खिचडी प्रसाद. सोमवार दि. २० डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते ११ वा. अत्तर, गुलाब-जलाभिषेक महापूजा, हवन व आरती, दुपारी १ ते २.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता साई सिद्धालय भजन मंडळ यांचे भजन, सायंकाळी ७ वाजता आरती, प्रार्थना, खिचडी प्रसाद व उत्सवाची सांगता होईल. साईभक्तांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, मंदिर नूतनीकरणासाठी भाविकांनी सढळ हस्ते मदत करावी, अशी विनंतीही केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:22 AM 16-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here