पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याची रोख रकमेसह बॅग चोरली

0

पावस : रत्नागिरी तालुक्यातील गोळप वडवली येथील नायरा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने तेथील कर्मचाऱ्यांच्या खांद्यावरील बॅग चोरी करून रोख रक्कम लंपास केल्याप्रकरणी दोन अज्ञातांविरुद्ध पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथील नायरा पेट्रोल पंपाचे श्री. मूसद्दीन, मुराद मुकादम यांनी पूर्णगड पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. दि. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वा सहा सुमारास स्वीफ्ट कारमधून दोन अज्ञात व्यक्ती एकमेकांच्या संगनमताने पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने पंपात दाखल झाले. त्यांनी पंपामध्ये काम करणारा कर्मचारी आदित्य माटल याच्या खांद्यावरील बॅगमध्ये २२५०० रोख रुपये असलेल्या बॅगेसह लंपास केली. तातडीने शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, ठावठिकाणा मिळाला नाही. अखेर १४ डिसेंबरला रात्री एक वाजता गाडीचा पत्ता न लागल्याने श्री मुकादम यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात रोख रक्कम चोरीस गेल्याची तक्रार करण्यात आली. या संदर्भात पोलिस अंमलदार श्री. देऊसकर तपास करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:34 AM 16-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here