मंत्री उदय सामंत यांनी घेतला स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या कामाचा आढावा

0

मुंबई : राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या अडचणी संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याप्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाचे कुलगुरू तसेच संबंधित अधिकारी यांच्या सोबत बुधवारी मुंबईतील सोमय्या भवन येथे बैठक झाली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, स्वयंअर्थसहाय्यित विद्यपीठातील कायदा व विद्यापीठाच्या अडचणीसंदर्भात लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादरीकरण करून आढावा बैठकीचे आयोजन करण्यात येईल. यासाठी गठीत केलेल्या समितीने कालमर्यादेत आपला अहवाल सादर करावा, अशा सूचनाही यावेळी दिल्या. बैठकीत स्वयंअर्थसहाय्यीत विद्यापीठाच्या प्रथम परिनियम व अध्यादेश मान्यता तसेच वैद्यकीय शिक्षण आणि कृषीविषयक शिक्षणाचे अभ्यासक्रम, स्वयंअर्थसहाय्यीत विद्यापीठ कायद्यातील नॅक मूल्यांकन अधिस्वीकृती कालावधी 3 वर्ष ऐवजी 7 वर्षे करणे. समूह विद्यापीठ संकल्पनेला विस्तारीत केंद्र व अभ्यास केंद्र स्थापन करण्यास परवानगी याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला गृह राज्यमंत्री सतेज पाटील, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ.अभय वाघ, सोमय्या विद्यापीठाचे समीर सोमय्या, संदीप विद्यापीठाचे डॉ.संदीप झा, बाळासाहेब रासकर, कृषी विभागाचे सहसंचालक, विजय भारती उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:47 AM 16-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here