राज्य सरकारमधील मंत्री करण जोहरच्या पार्टीत?; मुंबई महानगरपालिकेकडून स्पष्टीकरण

0

मुंबई : निर्माता दिग्दर्शक करण जोहरने आयोजीत केलेल्या पार्टीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्टीमध्ये राज्य सरकारमधील एक मंत्री सहभागी झाले होते, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. त्यावर आता मुंबई महापालिकेने स्पष्टीकरण दिले आहे. “बाधित रुग्णांचा संपर्क आलेल्या इमारतीचे सिसीटीव्ही तपासणे हे मुंबई महापालिकेच्या कोविड नियमावलीत बसत नाही. बाधित रुग्णांचा वावर जेथे झाला आहे त्या 3 इमारतींमध्ये कोविड टेस्टींग कॅम्प भरवून 110 जणांच्या कोविड टेस्ट करण्यात आल्या आहेत. परंतु, या सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. करण जोहरच्या इमारतीतील एकूण 54 टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. करण जोहर आणि बाधित रुग्णांनी दिलेल्या माहितीवरुन केलेल्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगनुसार 8 जण या पार्टीत होते. त्यांच्या जवळच्या संपर्कातील सर्वांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत.” अशी माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:35 PM 16-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here