दोन हजार रुपयांच्या नोटा बघण्याच्या बहाण्याने राजापुरातील दोन व्यापाऱ्यांना गंडा

0

राजापूर : दोन हजार रुपयांच्या नोटा बघायच्या आहेत, असे सांगून दुकानदाराला बोलण्यात गुंग करत दोन भामट्यांनी राजापुरातील दोन व्यापाऱ्यांना गंडा घातल्याचा प्रकार पुढे आला आहे. यातील एका व्यापाऱ्याच्या गल्लयातून सुमारे सात ते आठ हजार रुपये या भामट्यांनी लांबविले असून एका मेडिकलमध्ये अशाच प्रकारे पैसे लांबविण्याचा या भामट्यांचा प्रयत्न फसला आहे. या भामट्यांचे हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या भाट्याच्या प्रतापाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अपटुडेट कपड्यात असलेल्या या भामट्यांनी हा प्रकार केल्याचे या व्हिडीओत स्पष्ट दिसून येत आहे. सोमवारी दपारी २ ते २.३० वाजण्याच्या दरम्यान शिवाजीपथ रस्त्यालगत असलेल्या एका मिठाई दुकानात व मेडिकल स्टोअर्समध्ये हा प्रकार घडला आहे. मात्र, मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी राजापूर पोलिस स्थानकात संबधीत व्यापाऱ्यांकडून कोणतीही तक्रार करण्यात आली नव्हती. दरम्यान, राजापूर तालुका व्यापारी संघाने याची तातडीने गंभीर दखल घेतली असून संबंधित व्यापाऱ्यांना पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले आहे तर हा एकूणच प्रकार गंभीर असून शहरातील व्यापाऱ्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांनी केले आहे. सोमवारी दुपारी २ ते २.३० वाजण्याच्या दरम्यान दोन अज्ञात व्यक्तींनी हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे. याबाबत पोलिसांत तक्रार करा, असेही सांगितले तर व्यापाऱ्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहनही मालपेकर यांनी केले आहे. हे दोन्ही भामटे अपटुडेट कपडे घालून होते. एकाने चेहऱ्यावर मास्क लावला होता. ते दोघेही इंग्रजीत बोलत होते. मात्र, हळू आवाजात बोलत होते, त्यामुळे त्यांना इंग्रजीही नीट येत नव्हते, असे या व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यांची भाषा व्यवस्थित समजून येत नव्हती. या घटनेने राजापुरात खळबळ उडाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:39 PM 16-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here