दरवर्षीप्रमाणे पावस येथे रिक्षा चालक – मालक संघटना यांच्यातर्फे सत्यनारायण महापुजा घालण्यात आली. यावेळी पावस भागातील विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान माननीय आमदार श्री.राजन साळवी साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. माननीय आमदार श्री.राजन साळवी यांच्या हस्ते कराटे नॅशनल आणि इंटरनॅशनल चॅम्पियनशिप मध्ये यश मिळवलेल्या सर्व मुलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये कु. देवश्री सामंत, कु. वेदांत विजय भुते, कु.आर्या सुर्वे, कु.रुद्र दळवी, कु. मानसी गुरव, कु. आदित्य जोगळे यांनी मिळवलेल्या कराटे मधील यशासाठी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान केला. मा. आमदार श्री. राजन साळवी यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
