शेंबवणेत जागतिक मृदा दिनानिमित्त मार्गदर्शन

0

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील शेंबवणे येथे रविवारी जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. यावेळी एस. व्ही. बोडखे यांनी मृदा दिनाचे महत्त्व, जागतिक मृदा दिन २०२१ ची थीम-मातीचे क्षारीकरण थांबवणे, उत्पादकता वाढवणे यासंबंधी मार्गदर्शन केले. आंबा मोहोर संरक्षण, कृषिक ॲप, मृदा संवर्धनाचे महत्त्व सेंद्रिय शेती विषयी मार्गदर्शन केले. बी. पी. दोंड यांनी खतांचा संतुलित वापर कृषी विभागाच्या योजना, मग्रारोहयो फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, महाडीबीटी पोर्टलच्या सर्व योजनांविषयी मार्गदर्शन केले. यावेळी गावकर माणिक जवले. प्रगतिशील शेतकरी अनंत म्हादे, कृषिमित्र जितेंद्र चरकरी तसेच शेतकरी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:47 PM 17-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here