पूर येथील काडसिद्धेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षक परिषदेकडून वह्या वाटप

0

रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिक्षक परिषद शाखा संगमेश्वरतर्फे काडसिद्धेश्वर विद्यालय पूर, ता. संगमेश्वर येथे गरजू होतकरू, हुशार, ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक किल्लेदार यांनी प्रास्ताविकामध्ये विद्यार्थी हितकारक उपक्रमाची माहिती दिली. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज ओळखून जो विद्यार्थी शिक्षणापासून दूर गेले होते. त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मूलमंत्र दिलेला होता. डॉ. बाबासाहेबांच्या तत्त्वांचे व मूल्यांचे व्यक्तीच्या जीवनामध्ये अनुकरण करणे अशा विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती तालुकाध्यक्ष अनंतकुमार मोघे यांनी दिली. यावेळी तालुका सचिव शिवराज कांबळे, भरत धनपाल व कार्यक्रमावेळी काडसिद्धेश्वर विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक किल्लेदार व त्यांचे सहकारी यादव, सौ. पोळ, जाधव आदी उपस्थित होते. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वह्या वाटपाचा कार्यक्रम झाला. सुमारे बत्तीस विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. पूर हायस्कूलमधील शिक्षिका पोळ यांनी आभार मानले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:36 PM 17-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here