मुस्लीम ओबीसी दाखले रखडलेल्यानी संपर्क साधावा : जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन

0

रत्नागिरी : मुस्लीम ओबीसी समाजातील लोकांची जातीच्या दाखला मिळवण्यासठी शासन दरबारी पायपीट सुरू आहे. ज्या लोकांचे जातीचे दाखले रखडले आहेत त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन यांनी केले आहे. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनची सभा रत्नागिरीत नुकतीच पार पडली. या सभेत मुस्लीम ओबीसी समाजाच्या विविध समस्या, प्रश्नांवर जोरदार चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मुस्लीम ओबीसी समाजाला शासनाकडून देण्यात येणारे जातीचे दाखले वेळेवर मिळत नाहीत. या दाखल्यांसाठी एक-दोन बर्षे प्रतीक्षा करूनही ते मिळत नाहीत. त्यासाठी या लोकांना शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. या लोकांना दाखला देण्यासाठी त्यामध्ये काय त्रुटी आहेत याचेही लेखी स्वरुपात कळविले जात नाही. हे सर्व जाणीवपूर्वक केले जात आहे का, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. अशा मुस्लीम ओबीसी समाजातील लोकांनी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष शेकासन यांनी केले. जातीचे दाखले वेळेवर मिळत नसल्याने मुस्लीम ओबीसी समाजातील विद्यार्थी तसेच लोक शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत, त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, यावरही चर्चा झाली. संघटना वाढीसाठी प्रत्येक गावातील मुस्लीम मोहल्यांपर्यंत पोहोचावे. तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. लवकरच ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीरभाई अन्सारी हे जिल्हा दोऱ्यावर येणार असून त्याचेही नियोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष निसार दर्वे, जमुरत अल्जी, सल्लागार शेखअहमद हुश्ये, जिल्हा सरचिटणीस रहिम दलाल, रमजान गोलंदाज, सचिव जमीर खलपे, रत्नागिरी तालुकाध्यक्ष निसार राजपूरकर, ॲड. खदीजा प्रधान, तैमूर अल्जी, इमरान सोलकर, आतिफ साखरकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:45 PM 17-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here