नयनरम्य मिऱ्या बंधाऱ्याचे २६ डिसेंबर रोजी होणार भूमिपूजन : ना. उदय सामंत

0

रत्नागिरी : १६९ कोटी खर्च करून बांधण्यात येणाऱ्या मिऱ्या बंधाऱ्याचे भूमिपूजन २६ डिसेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन पद्धतीने तर उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब, ना. उदय सामंत, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आदी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. समुद्राच्या अजस्त्र लाटांमुळे मिऱ्या किनाऱ्याची धूप होऊन येथील जनजीवनाला धोका निर्माण झाला होता. दर पावसाळ्यात येथील नागरिक उधाणाच्या भरतीला जीव मुठीत धरून जीवन जगत असत. मात्र या नवीन होणाऱ्या बंधाऱ्यामुळे मिऱ्या गावाला सुरक्षाकवच मिळणार आहे. १६९ कोटीची वर्कऑर्डर प्रशासने दिली आहे. या बंधारा केवळ बंधारा न ठरता येथे पर्यटन विकसित व्हावे म्हणून २५ कोटी रुपयांचा अधिकचा निधी देण्याचे देखील निश्चित करण्यात आले आहे. या बंधाऱ्याच्या निमित्ताने येथील पर्यटन वाढीस लागले तर येथील तरुणांना देखील रोजगार मिळेल हि याम्गाची भावना असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले आहे. मिऱ्यावासीयांची अनेक दिवसांची मागणी या बंधाऱ्यामुळे पूर्णत्वास जात असून यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे ना. सामंत यांचे देखील नागरिकांनी आभार मानले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:58 PM 17-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here