Breaking news : रामदास कदम शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देणार?

0

मुंबई : शिवसेना नेते रामदास कदम हे शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे रामदास कदम यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज आहेत. त्यामुळे कदम हे नाराज असून ते शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात ते याबाबतची घोषणा करू शकतात. त्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

रामदास कदम यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमधून ते शिवसेना परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात कारवाई करत असल्याचं दिसून येत आहे. परब यांचा रिसॉर्ट पाडण्यासाठी कदम हे भाजप नेते किरीट सोमय्या यांना मदत करत असल्याचं दिसून येत आहे. या क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यावर रामदास कदम यांनी स्पष्टीकरण देताना ही क्लिप आपली नसून कुणाचं तरी हे षडयंत्रं असल्याचं म्हटलं होतं.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:25 PM 18-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here