कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांचे २३ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलन

0

रत्नागिरी : कोकणातील आंबा, काजु, नारळ इत्यादि फळ बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. २३ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बागायतदारांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. कोकणातील आंबा, काजु, नारळ व चिक्कु इ. फळबागायतींमधुन शेतकरी व शेतमजुर यांना रोजगाराची संधी उपलब्ध होत असुन अनेकांच्या कुटूंबाचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. परंतु गेली १०-१५ वर्षे निसर्गाच्या बदलातुन वादळ, वारा व अकाली पाऊस, ढगाळ वातावरण, रासायनीक प्रदुषण यामुळे बागायतदार शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात आंबा, काजु, इ. फळझाडांना चांगले मोहोर आले असतानाच अवकाळी पाऊस पडुन मोहोरावर किड, करपा, बुरशी व भुरी इ. रोगांची लागण होऊन फळ पिकांची मोठया प्रमाणात हानी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी स्वत:च्या कष्टाने फळबागांचे संगोपन करुन आंबा, काजु व्यवसायीकांनी पिक कर्ज घेतली परंतु निसर्गाच्या बदलत्या स्थितीमुळे कर्जाची परतफेड होऊ शकली नाही. त्यामुळे बँकामार्फत न्यायालयांकडुन वसुलीचे मार्ग अवलंबुन शेतकऱ्यांकडून सक्तिने कर्जवसुली करणेबाबतची कार्यवाही ही शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याच्या हेतुने केली जात आहे. कर्जाच्या पुर्नघटनेबाबतही शासनाचे दुर्लक्ष होत आहे. या सर्व कारणांकरीता कोकणातील शेतकऱ्यांकडुन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.२३ डिसेंबर २०२१ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:17 PM 18-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here