पूर्णगड दत्त मंदिरावर कलशारोहण

0

पावस : रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड लोकरेवाडी येथे दत्त मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा प. पू. गगनगिरी महाराज यांचे शिष्य उल्हासगिरी महाराज यांच्याहस्ते संपन्न झाला. पूर्णगड हे इतिहासाची साक्ष असलेलं मुचकुंदी नदीच्या काठावर आणि पूर्णगड खाडीकिनारी वसलेल्या ठिकाणी इच्छापूर्ती देवस्थान श्री दत्त मंदिराची स्थापना १९५२ साली झाली. सन २०२१ मध्ये या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले. दि. १२ व १३ डिसेंबर रोजी जीर्णोद्धार सोहळा मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण प. पू. गगनगिरी महाराज यांचे शिष्य उल्हासगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. दि. १८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता श्री दत्त जन्मसोहळा व रात्री आठ वाजता भजन सम्राट श्री. भगवान बुवा लोकरे यांचे भजन व रात्री १० वा. श्री दत्त मंदिर देवस्थान आयोजित ‘स्वरनाद’ हा गायनाचा कार्यक्रम दि. १९ रोजी सकाळी १० वा. आमंत्रित भजन स्पर्धा व रात्री १० वाजता पावस पंचक्रोशीमधील ग्रुप डान्स स्पर्धा व दि. २० रोजी सकाळी. ११ वा. महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष भगवान बुवा लोकरे यांनी केलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:10 PM 18-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here