चिपळूण बचाव समितीचे भिक मांगो आंदोलन

0

चिपळूण : चिपळूणच्या नद्यांमधील गाळ काढण्यासाठी शासनाकडे पैसे नाहीत म्हणून चिपळूण बचाव समितीने भिक मांगो आंदोलन सुरू केले आहे. ‘भिक द्या, भिक द्या, एक रुपयाची भिक द्या, गाळ काढण्यासाठी शासनाला एक रुपयाची भिक द्या,’ या पद्धतीने भिक मांगो आंदोलन सुरू केले आहे. यातून तरी गाळ काढण्यासाठी नक्कीच अर्थसहाय्य होईल, असा उपरोधिक विश्वास चिपळूण बचाव समितीला आहे. तर सोमवारी दि. २० रोजी मूक मोर्चा काढण्यात येणार असून भिक मांगो आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. नंतर या आंदोलनातून जमा होणारी रक्कम प्रांताकडे दिली जाणार आहे, या पद्धतीने शासनाचे गाळ काढण्याच्या ठोस भूमिकेकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध करण्यात येणार आहे. वाशिष्ठी व शिवनदी तसेच उपनद्यांमधील गाळ काढण्यात यावा, तसेच लाल व निळी पूररेषा रद्द करावी, या मागणीसाठी चिपळूण बचाव समितीने ६ डिसेंबरपासून प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला शहरातील नागरिकांसह परिसरातील ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. व्यापारी, उद्योजक, संस्था, मंडळे यांचाही अभुतपुर्व पाठिंबा मिळत आहे. न्याय मिळाल्याशिवाय मागे हटायचं नाही, अशी भुमिका समितीने घेतली आहे. या आंदोलनाची दखल घेऊन महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पहिली बैठक घेतली मात्र, या बैठकीत कोणताही निर्णय घेतला गेला नाही. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील विविध खात्यांचा मंत्र्यांचा सहभाग असणारी जॅबो बैठक घेतली, मात्र या बैठकीत तितकेसे निष्पन्न झाले नाही. दरम्यान, आ. शेखर निकम यांनी पाठपुरावा करून साडेनऊ कोटी रुपयांवरच महाविकास आघाडी सरकारची भुमिका थांबली आहे. यामुळे या निधीतून गाळ काढण्याचे काम होणार नाही. ही बाब लक्षात घेऊन चिपळूण बचाव समितीने आक्रमक पवित्रा स्विकारण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने शनिवारी भिक मांगो आंदोलन सुरु केले असून रविवार यातून जमा होणारी रक्कम प्रांताधिकाऱ्यांकडे दिली जाणार आहे. तर सोमवारी मुक मोर्चा काढून शासनाच्या भुमिका निषेध केला जाणार आहे. एकंदरीत बचाव समिती न्याय मिळवून घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असे चित्र पहावयास मिळत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:16 PM 18-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here