एसटी कर्मचारी संप: आजच्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. २० डिसेंबरला संपाबाबत योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. संपाची पुढील दिशा ठरविली जाणार असल्याची चर्चा एसटी कृती समितीमध्ये सुरू आहे. मात्र, ठोस निर्णय होईल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. दि. २० डिसेंबरनंतरच संपाची पुढची दिशा ठरेल, असे कर्मचारी संघटनांनी यापूर्वी म्हटले असल्याने सोमवारच्या निर्णयाकडे अवघ्या महाराष्ट्राचे विशेषतः एसटी प्रशासनाचे लक्ष लागुन राहिले आहे. आठवड्यापासून काही कर्मचारी हजर झाल्यानंतर एसटीचे वेळापत्रक काहीअंशी का होईना सुरू झाले. मात्र, अद्यापही याला आवश्यक प्रमाणात प्रतिसाद मिळालेला नाही. कार्यालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती जवळपास ३०० आहे. मात्र, चालक-वाहकांची उपस्थिती केवळ ११० च्या दरम्यान आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:16 AM 20-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here