विलीनीकरणाचा लढा दाबून दाखवा; गुणरत्न सदावर्ते यांचे बारामतीतून पवारांना आव्हान

0

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कामगारांचा शासकिय सेवेतील विलीनीकरणाचा लढा दाबून दाखवावा, असे आव्हान गुणरत्न सदावर्ते यांनी बारामती येथे रविवारी एसटी कामगारांसमोर बोलताना दिले. तसेच तुमच्यासाठी हा संप असला तरी आमच्यासाठी दुखवटा आहे, असेही यावेळी ते म्हणाले. बारामती येथील एमआयडीसी आगाराजवळ मागील ४५ दिवसांपासून एसटी कामगारांचे शासकिय सेवेमध्ये विलीनीकरणाचासाठी दुखवटा आंदोलन सुरू आहे. एसटी कामगारांच्या या दुखवटा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुणरत्न सदावर्ते यांनी बारामतीमध्ये हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते. सदावर्ते पुढे म्हणाले, शरद पवारांनी साखर सम्राट घडवले. त्यांचे ते अराध्य दैवत झाले मात्र त्यांना कामरागांचे कैवारी होता आले नाही. पवारांनी लोकांची दिशाभूल करून पावसात मतांचा जोगवा मागितला. उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब म्हणतात कामगारांनी आंदोलन ताणू नये. मात्र ज्याचं जळत त्यालाच कळतं. मात्र तुम्ही आमचा विलनीकरणाचा लढा दाबू शकत नाही. आम्हाला निलंबनाची, सेवासमाप्तीची भीती वाटत नाही, असेही यावेळी सदावर्ते म्हणाले. यावेळी जयश्री पाटील, दशरथ राऊत, काळूराम चौधरी आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:19 AM 20-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here