विधानपरिषदेच्या नेतेपदी अजित पवार विराजमान

0

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आणखी एक महत्वाच्या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी पवार यांची आज निवड करण्यात आली आहे. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी कामकाज सुरु होताच अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. शिवसेनेचे नेते सुभाष देसाई याआधी विधान परिषदेच्या सभागृहाचे नेते होते. मागच्या पाच वर्षात विधान परिषदेतील भाजपाची सदस्य संख्या बर्‍यापैकी वाढलेली आहे. त्यामुळे विधानपरिषदेत सरकारची बाजू भक्कमपणे मांडणारा नेत्याची आवश्यकता होती. सुभाष देसाई हे मवाळ नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या उलट अजित पवार हे स्पष्टवक्ते आणि आक्रमक म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच की काय त्यांची निवड करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, नागपूर येथील अधिवेशनात अजित पवार यांनी वेळोवेळी सभागृहात नियमांचे दाखले देत कामकाज चालविण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे विधान परिषदेतील कामकाजात अधिक सुसूत्रता येण्याची शक्यता आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here