पाकिस्तानी बोटीतून जप्त केले तब्बल 400 कोटींचे हेरॉईन; गुजरातमध्ये मोठी कारवाई

0

गांधीनगर : गुजरातच्या किनाऱ्यावर पाकिस्तानची एक मासेमारी करणारी बोट पकडण्यात आली आहे. या बोटीतून 77 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या या हेरॉईनची किंमत तब्बल 400 कोटी रूपये आहे. ही कारवाई भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने संयुक्तरित्या रविवारी रात्री केली आहे. पकडण्यात आलेल्या पाकिस्तानच्या या बोटीचे नाव ‘अल हुसेनी’ असे आहे. या बोटीत सहा क्रू सदस्य होते. भारतीय जलक्षेत्रात ही बोट पकडण्यात आल्याची माहिती संरक्षण जनसंपर्क कार्यालयाने दिली आहे. पुढील तपासासाठी ही बोट गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ किनारपट्टीवर आणण्यात आली असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे. जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेल्या पाकिस्तानच्या या मासेमारी करणाऱ्या बोटीतून रविवारी रात्री 77 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत तब्बल 400 कोटी रूपये आहे.

दरम्यान, या आधीही 15 सप्टेंबर रोजी गुजरातमध्येच अदानी समूहाकडे मालकी असलेल्या मुंद्रा पोर्टवरुन तीन हजार किलोचे ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. अफगाणिस्तानवरुन दोन कंटेनरच्या माध्यमातून आलेलं हिरॉईन (ड्रग्ज) हे तब्बल 15 हजार कोटी किंमतीचे असल्याचं सांगितलं जात आहे. ही कारवाई केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या Directorate of Revenue Intelligence (DRI) आणि कस्टम विभागाच्या वतीनं 15 सप्टेंबरला करण्यात आली होती.

दोन कन्टेनरमधून भरुन आलेल्या या कन्टेनरमधून टॅल्कम पावडर आणण्यात येत आहे अशा प्रकारची कागदपत्रे रंगवण्यात आली होती. हे दोन्ही कन्टेनर अफगाणिस्तानच्या हसन हुसेन लिमिटेड या कंपनीने निर्यात केले असून ते आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील एका कंपनीने मागवल्याची माहिती समोर आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:21 PM 20-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here