चिपळूण येथे ‘पेन्शनर डे’ उत्साहात संपन्न

0

चिपळूण : महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समिती तालुका शाखा चिपळूण यांचे मार्फत आयोजित ‘पेन्शनर डे’ चा कार्यक्रम दि. १७ डिसेंबर रोजी प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभागृहत तालूका अध्यक्ष उस्मान बांगी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या कार्यक्रमास चिपळूण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत उपस्थित होते. यावेळी वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्या १५ निवृतीधारकांचा यतोचित सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. निवृतीधारकांच्या विविध प्रलंबित प्रश्नाची माहिती जाणून घेण्यासाठी गटविकास अधिकारी श्री. राऊत यांनी निवृत्त कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. तसेच ही प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन दिले. या बाबतीत आपण तालुका संघटनेच्या पदाधिकारी यांचे समवेत पेन्शन कक्षाचे वेळी नियमितपणे आढावा घेऊ, असे सांगितलं. संघटनेच्या वतीने श्री. राऊत यांचा अध्यक्ष उस्मान बांगी यांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. याप्रसंगी शिक्षक बँकेचे व्यवस्थापक श्री. सावर्डेकर यांचा सत्कार कार्याध्यक्ष वसंत साळवी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपाध्यक्ष विलास बिजितकर, सूत्रसंचालन सचिव रामदास सावर्डेकर, तर आभार सदस्य सुरेश पवार यांनी मानले. या कार्यकमास मोठ्या संख्येने निवृत्त सभासद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सूर्यकांत रहाटे, अनंत पवार, प्रताप गजमल, महादेव गराटे, दत्ताराम महाडिक, बबन राणीम, आणि माणिक बाचीम यांनी विशेष प्रयत्न केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:19 PM 20-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here