कोकणातील 11 लाख 76 हजार शेतकऱ्यांना 4 हजार 326 कोटींचे वीजबिल माफ

0

त्नागिरी : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण 2020 मधून वर्षानुवर्ष थकबाकीमध्ये असलेल्या कृषिपंपांचे वीजबिल कोरे करण्याची संधी शेतकर्‍यांना मिळाली आहे. थकबाकीच्या योजनेनुसार महावितरणकडून निर्लेखन तसेच विलंब आकार व व्याजातील कोकण प्रादेशिक विभागातील 11 लाख 76 हजार 490 शेतकर्‍यांचे 4326 कोटी 74 लाख रुपये माफ करण्यात आले असून, 9200 कोटी 80 लाखांच्या सुधारित थकबाकीपैकी 50 टक्के रक्कम व चालू वीजबिल भरल्यास थकबाकीचे उर्वरित 4600 कोटी 4 लाख रुपयेही माफ होणार आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या कृषिपंप वीजजोडणी धोरणातून कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुमारे 66 टक्के सूट देण्यात येत आहे. राज्यातील 44 लाख 50 हजार 828 शेतकर्‍यांकडे सप्टेंबर 2020पर्यंत 45 हजार 804 कोटी रुपयांची मूळ थकबाकी होती. यात महावितरणने निर्लेखित केलेले 10 हजार 420 कोटी 65 लाख आणि विलंब आकार व व्याजामधून 4 हजार 676 कोटी 1 लाख रुपयांची सूट अशी एकूण 15 हजार 96 कोटी 66 लाखांची रक्कम माफ करण्यात आली आहे. सोबतच वीजबिलांच्या दुरुस्तीमधून 266 कोटी 67 लाख रुपयांची रक्कम समायोजित करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांकडे आता 30 हजार 441 कोटी 75 लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. थकबाकीदार शेतकर्‍यांनी चालू वीजबिल तसेच येत्या मार्च 2022 पर्यंत थकबाकीची 50 टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित 50 टक्के म्हणजे 15 हजार 353 कोटी 88 लाख रुपये माफ होणार आहेत. या संधीचा लाभ घेतल्यास राज्यातील शेतकर्‍यांना वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी एकूण 30 हजार 450 कोटी 56 लाख रुपयांची माफी मिळणार आहे. कोकण प्रादेशिक विभागात 11 लाख 76 हजार 490 शेतकर्‍यांचे 4326 कोटी 74 लाख रुपये माफ करण्यात आले असून 9200 कोटी 80 लाखांच्या सुधारित थकबाकीपैकी 50 टक्के रक्कम व चालू वीजबिल भरल्यास थकबाकीचे उर्वरित 4600 कोटी 4 लाख रुपये माफ होतील. वीजग्राहकांकडे बिलांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने महावितरण सद्यस्थितीत अत्यंत कठीण आर्थिक संकटात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी कृषिपंपाच्या चालू वीजबिलांची रक्कम भरणे आवश्यक झाले आहे. योजनेत सहभाग नाही तसेच चालू वीजबिलांचा भरणा देखील नाही अशा शेतकर्‍यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करण्याची कटू कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी वीजबिल थकबाकीमुक्ती योजनेत सहभागी व्हावे व सोबतच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:39 PM 20-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here