सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देणार : गजानन पाटील

0

खंडाळा : ग्रामीण भागांमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, रोजगार आणि इतरांना रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून विविध योजनांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यात लाभ मिळवून देतानाच त्यांच्या आजपर्यंतच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक गजानन कमलाकर तथा आबा पाटील यांनी व्यक्त केले आहे. ते रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद जिल्हा परिषद गट, शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात काम करणारी एक अग्रगण्य बँक असून, या माध्यमातून ग्रामीण भागांमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना फायदा होणे आवश्यक आहे. तो फायदा विविध माध्यमातून होईल यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करून सर्वांनाच या प्रवाहात सामील करून घेण्याचे नियोजित आहे. त्यासोबतच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संचालक पदासाठीच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत, रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, यांच्या माध्यमातून यांच्या पुढाकाराने रत्नागिरी जिल्ह्यात सहकार पॅनेल निर्माण झाले आणि या सहकार पॅनेल मधून मला निवडणूक लढवून जिंकून येण्याचे भाग्य लाभले आहे. यासाठी रत्नागिरी तालुक्यातील सर्व मतदारांनी मोठ्या प्रमाणावर टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठीच भविष्यात नियोजन असेल. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रामाणिक असणाऱ्या शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्यासह सर्वच लोकांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून आपल्या कामामध्ये गती देऊन विकास साधावा, यासाठी संपूर्णपणे बँक आणि सहकारी क्षेत्र त्यांच्या पाठीशी असल्याचा ठाम विश्वास यावेळी श्री. गजानन कमलाकर तथा आबा पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांचा जिल्हा परिषद गट वाटद शिवसेनेच्या वतीने भव्य सत्कार समारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा पंचायत समिती रत्नागिरीचे माजी सभापती प्रकाश साळवी, ग्रामपंचायत जयगडचे माजी सरपंच अनिरुद्ध साळवी, ग्रामपंचायत गडनरळचे माजी सदस्य तथा शिव सहकार सेनेचे वाटद विभाग प्रमुख नामदेव चौगुले, तसेच रीळचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते तुषार चव्हाण यांनी यावेळी आपल्या मनोगतातून विविध प्रश्नांकडे विद्यमान उपस्थित पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाला वाटद जिल्हा परिषद गटाचे विभाग प्रमुख योगेंद्र तथा बाबय कल्याणकर, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण सभापती तथा विद्यमान सदस्य ऋतुजा जाधव, रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य मेघना पाष्टे, उपविभागप्रमुख अजीम चिकटे यांच्यासह शिवसेनेचे विभागीय कार्यालय प्रमुख एकनाथ सखाराम तथा अप्पा धनावडे यांच्यासह परिसरातील शिवसैनिक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते सुनील विठ्ठल तथा भाई जाधव यांनी केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:42 AM 21-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here