राज्यातील पहिले कौशल्य विकास केंद्र रत्नागिरीत सुरु होणार – उदय सामंत

0

राज्यातील पहिले कौशल्य विकास केंद्र रत्नागिरीतील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. येथील अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या तरुणाला लगेच नोकरी मिळेल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली. तसेच महाराष्ट्रातील कोणतेच पॉलिटेक्निक कॉलेज बंद पडू देणार नाही. त्यासाठी राज्यातील सहा शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) अपग्रेड करण्यात येणार आहेत. त्यात रत्नागिरीसह कोल्हापूर, पुणे, अमरावती, नागपूर आणि शहरी भागातील ठाणे, मुंबईचा समावेश आहे. यामध्ये तेथील परिस्थितीनुसार अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत, असेही श्री. सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here