दहावीच्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास मुदतवाढ

0

रत्नागिरी : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करण्यास पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी आता नियमित शुल्कासह २६ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरू शकतात. यापूर्वीची मुदत २० डिसेंबर रोजी संपत होती. ही मुदतवाढ नियमित, खासगी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षा देणारे आदी सर्वांना लागू राहील. याआधी उमेदवारांना १२ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत आणि विलंब शुल्कासह २१ डिसेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे. पण एसएससी बोडनि याला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. अर्ज भरताना माध्यमिक शाळांना तांत्रिक व इतर अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. नव्या सुधारित वेळापत्रकानसार नियमित शल्कासह २६ डिसेंबरपर्यंत तर विलंब शुल्कासह २७ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत दहावी परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. माध्यमिक शाळांनी सरल डेटाबेसवरून नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे आहेत. यानंतर ६ जानेवारीपर्यंत शाळा चलन डाऊनलोड करून बँकेत शुल्क भरू शकतात. त्यानंतर माध्यमिक शाळांनी प्री-लिस्ट मंडळाकडे जमा करण्याची अंतिम मुदत ४ जानेवारी आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:38 AM 21-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here