दापोलीतील शिक्षक नेत्यावर जिल्हा परिषद प्रशासनाची शिस्तभंगाची कारवाई

0

रत्नागिरी : प्राथमिक शिक्षकांची बाजू घेणे एका शिक्षक नेत्याला चांगलेच भोवलं आहे. या शिक्षक नेत्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने शिस्तभंगाची कारवाई करत एक वेतनश्रेणी थांबवली आहे. या प्रकरणावरून शिक्षकांमधून नाराजी होत असून याची उलटसुलट चर्चा सुरू आहे. मंडणगड तालुक्यातील पणदेरी येथील धरणाला जुलै महिन्यात गळती लागली होती. या धरणावर वाँच ठेवण्यासाठी प्रशासनाने तब्बल २४ शिक्षकांची नियुक्ती केली होती. हा विषय त्यावेळी वादग्रस्त व गाजला होता. याबाबत दापोली तालुक्यातील शिक्षक संघटनेच्या नेत्याने शिक्षकांची बाजू घेतली होती. याबाबत त्यांनी आपली आक्रमक भूमिकाही मांडली होती. हा विषय जि.प.च्या शिक्षण विभागाने गंभीरपणे घेत चक्क या शिक्षकावरच कारवाई करण्याचा निर्णय घेतला. शिक्षण समितीच्या मासिक सभेतही तसा ठराव करण्यात आला. त्यानुसार या शिक्षकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईच्या नोटिसीमध्ये शिक्षक पदाच्या कर्तव्यात सचोटी न ठेवल्याचे स्पष्टपणे दिसून आले. नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग केलेला आहे. या गैरवर्तनासाठी नियम १९६४ मधील भाग ३ नियम ४ (२) नुसार वेतनवाढीवर परिणाम न करणारी एक वेतनवाढ थांबवण्यात येत आहे, असे या नोटिसीत म्हटले आहे. या कारवाईनंतर शिक्षकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत. वास्तविक शिक्षकांची बाजू घेणे हा काही मोठा गुन्हा नाही. असे असताना त्या शिक्षकावर जाणूनबुजून कारवाई केल्याचे म्हटले जात आहे. संघटना अंतर्गत वादामुळेही ही कारवाई केल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. तसेच यामध्ये लोकप्रतिनिधींचाही समावेश असल्याचे म्हटले जात आहे. एकंदरीत या नेत्याला शिक्षकांची बाजू घेणे चांगलेच महागात पडले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:52 AM 21-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here