रत्नागिरी : घरासमोरील दुचाकी लांबवल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते १२.३० च्या कालावधीत हातखंबा येथील गणेशनगर येथे घडली आहे. याबाबत योगिता योगेश शिवगण (३१, रा.हातखंबा, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली आहे. योगिता यांच्या पतीने घरासमोरील रस्त्यावर ज्यूपीटर दुचाकी (एमएच०८-एआर-८१०८) चावीसह उभी केली होती.
