उत्पन्न वाढवा; २ लाखांचे बक्षीस मिळवा – अनिल परब

0

एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या ‘उत्पन्न वाढवा’, विशेष अभियानांतर्गत एका महिन्यात (मागील वर्षाच्या तुलनेत) सर्वाधिक उत्पन्न आणणाऱ्या आगारांना दरमहा रुपये २ लाख इतके रोख बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी केली. तोट्यात असणाऱ्या रत्नागिरी आगारापुढे बक्षीस मिळवण्याचे तगडे आव्हान उभे केले आहे. तसेच या अभियानाअंतर्गत जे आगार निकृष्ट कामगिरी करतील, त्या आगारातील जबाबदार अधिकाऱ्यांना शिक्षेचे प्रयोजन देखील ठेवण्यात आले आहे. हे अभियान १ मार्च ते ३० एप्रिल २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी राबवण्यात येणार आहे. एस.टी. चे प्रवासी उत्पन्न वाढावे यासाठी एस.टी.च्या २५० आगारांची (डेपो) प्रदेशनिहाय विभागणी करून प्रत्येक प्रदेशातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करून उत्पन्नामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न आणणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या आगारात दरमहा रुपये २ लाख, द्वितीय आगारास रुपये १.५ लाख व तृतीय आगारास रुपये १ लाख असे बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. याबरोबरच महामंडळाच्या ३१ विभागापैकी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांना देखील आगाराप्रमाणे प्रथम क्रमांक रू २ लाख, द्वितीय क्रमांकास रू १.५ लाख व तृतीय क्रमांकास रू१ लाख २५ हजार असे रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. अर्थात हे अभियान प्रयोगिक तत्वावर १ मार्च ते ३० एप्रिल २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी राबविण्यात येत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here