एम. आय. बी गर्ल्स हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये अल्पसंख्याक दिन साजरा

0

खेड : शहरातील बज्म-ए-इमदादीया संचलित एम.आय.बी गर्ल्स हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये अल्पसंख्याक दिनाचे आयोजन प्रशालेचे मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार यांच्याच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या प्रसंगी वक्तृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सुमैया शौकत मोटलेकरच्या कुरआन पठणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स. शिक्षक झियाऊर रहमान खान यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. जैबा खतिब यांनी अल्पसंख्याकांच्या अधिकारांची माहिती दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक परकार सरांनी अल्पसंख्यांकांची व्याख्या समजावून देताना त्यांचे हक्क व कर्तव्यांची सविस्तर माहिती दिली. सुमित होमकळस सरांच्या आभारप्रदर्शनाने समारोप करण्यात आला. सूत्रसंचालन अनम पटेल यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागप्रमुख झियाऊर रहमान खान व प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:12 PM 21-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here