लखीमपूर हिंसाचार घटनेप्रकरणी केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनी केलेल्या विधानामुळे खळबळ

0

नवी दिल्ली : देशात गाजलेल्या लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराचा मुद्दा आज संसेदत गाजत आहे. मात्र, यासंदर्भात बोलताना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. आशिष मिश्रा यांच्या एसयूव्हीने शेतकर्‍यांना चिरडले होते, या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानंतर हिंसाचार उसळला आणि आणखी चार जणांना आपला जीव गमवावा लागला. शेतकऱ्यांनी या घटनेनंतर दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आशिष मिश्राचे नाव आहे. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या तपास पथकाने हा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे म्हटले. मात्र, लखीमपूर खेरी येथील घटना केवळ अपघात असल्याचं विधान नितीन गडकरी यांनी केलं आहे. ”लखीमपूर येथील घटना ही जबरदस्ती नसून केवळ अपघात असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं. हे बघा, ते अन्यापूर्वक आहे, या घटनेची सविस्तरपणे माहिती आली आहे. जाणीवपूर्वक भावनेनं ही घटना घडली नसून हा एक अपघात आहे,” या घटनेचं कुणीही राजकारण करू नये, असे नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:03 PM 21-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here