तेरा वर्षांपूर्वी संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब येथे चिपळूण येथील एका वा व्यावसायिकाच्या खून प्रकरणातील आरोपी पॅरोलवर सुटका झाल्यानंतर फरार झाला होता. देवरूख पोलोस या आरोपीचा शोध घेत होते. गुप्त सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी डोंबिवली रामनगर येथे असल्याची माहिती देवरुख पोलिसांना मिळाली होती. यानुसार देवरूख पोलिसांनी सापळा रचून बुधवारी फरार अजय दत्ताराम सुर्वे (वय ३८ वर्षे, रा, तुळसणी) वाला ताब्यात घेतले. न्यायाधिशांनी अजय याची जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे.
