जिल्ह्यात आज 3 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

0

रत्नागिरी : आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 787 अहवालांमध्ये 3 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर तीन जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. 24 तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत 31 रुग्ण उपचारखाली आहेत. नव्याने 3 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 79 हजार 138 इतकी झाली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 3 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 76 हजार 617 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 96.82 टक्के आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 490 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.15 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 11 तर संस्थात्मक विलगीकरणात 20 रुग्ण उपचार घेत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:05 PM 21-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here