पाच दिवसांचा आठवडा लागू होण्यासाठी सरकारी कार्यालयांवर हे नियम बंधनकारक

0

येत्या 29 फेब्रुवारीपासून राज्यातील सरकारी कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू होणार आहे. शनिवारी आणि रविवारी सरकारी कार्यालये बंद राहतील. त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. एकीकडे सरकारी कार्यलयांसाठी 5 दिवसांचा आठवडा असताना दुसरीकडे काही सरकारी कार्यालये यातून वगळण्यात आली आहेत. ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम किंवा औद्योगिक विवाद लागू आहे. किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात अशा विभागांना पाच दिवसाचा आठवडा लागू होणार नाही. यामध्ये शासकिय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलिस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार यांचा समावेश आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here