ट्रम्प यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल

0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांचं मोठ्या आदराने स्वागत केलं. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. आपल्या भाषणात त्यांनी पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे. दहशतवादापासून नागरिकांना वाचवण्यासाठी आम्ही दोघे मिळून एकत्र काम करू. आम्ही मिळून सीमेपलीकडील दहशतवाद संपवण्याचा प्रयत्न करू, असं ट्रम्प यांनी म्हटलंं आहे. कट्टरपंथी इस्लामी दहशतवादाच्या धोक्यापासून नागरिकांना वाचवण्यासाठी दोन्ही देश एकत्रित आहेत. माझ्या प्रशासनात आम्ही आयसिसच्या रक्तरंजित मारेकऱ्यांचा पूर्ण खात्मा केला. आम्ही राक्षस अल बगदादीला कंठस्नान घातलं, असल्याचं ट्रम्प यांनी यावेळी बोलताना सांगितलं. दरम्यान, आम्ही हा भारावून टाकणारा पाहुणचार नेहमी लक्षात ठेवू. भारतासाठी आमच्या अंतःकरणात विशेष स्थान आहे, अशाही भावना ट्रम्प यांनी व्यक्त केल्या.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here