लायन्स क्लब रत्नागिरी आणि लेन्स आर्ट रत्नागिरीतर्फे छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन

0

बदलत्या काळात पर्यावरणाचं संरक्षण करण्याचं खूप मोठं आव्हान आपल्यासमोर उभं आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात पर्यावरणाच्या हानी मुळे होणाऱ्या नुकसानाच्या बातम्या आपल्याला बेचैन करत आहेत. अशा परिस्थितीत आपण स्वस्थ न बसता काही तरी करणं आवश्यक आहे. यातली एक पायरी आहे, या प्रश्र्नांबद्दल जनजागृती करणं. ही कल्पना मनात घेऊन लायन्स क्लब रत्नागिरी आणि लेन्स आर्ट रत्नागिरी एक छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन आयोजित करीत आहेत. आपल्या सभोवतालचा निसर्ग, त्यातली जैवविविधता, मानव आणि निसर्ग यातला संबंध आणि संघर्ष हे विषय छायाचित्रांच्या माध्यमातून मांडणं हा या स्पर्धेचा उद्देश आहे.

IMG-20220514-WA0009

ह्या स्पर्धेसाठी तीन विषय निवडण्यात आले आहेत.
1. Animal / Bird Life
2. Plant Life
3. Urban / Natural Landscape

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढे दिलेल्या अटीनुसार फोटो पाठवण्यात यावे. फोटो मोबाइलवरून काढला असेल तरी रिझोल्यूशन आणि विषयाची मांडणी चांगली असेल तर पाठवायला हरकत नाही. आलेल्या फोटोमधून चांगल्या दर्जाच्या निवडक फोटोंचं प्रदर्शन भरवलं जाईल. प्रत्येक विषयातील दोन सर्वोत्तम फोटोना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. सर्व फोटोमधून एक अंतिम विजेता ठरवला जाईल. प्रदर्शन मार्चच्या पहिल्या आठवड्यात भरवले जाईल. प्रदर्शनाचे ठिकाण लवकरच सुनिश्चित केले जाईल. प्रदर्शनातील फोटो विक्रीसाठी उपलब्ध असतील. फोटो विकले गेल्यास 60% रक्कम फोटो काढणाऱ्याला देण्यात येईल.
स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.

फोटो पाठवताना पुढील तांत्रिक बाबींची पूर्तता करावी.
1) फोटो 12″ x 18″ आणि 300 dpi एवढ्याच साईझ मध्ये हवा.
2) प्रत्येक विषयाचे फक्त 3 फोटो प्रत्येकाने पाठवावेत. सगळे विषय मिळून एकूण जास्तीत जास्त 9 फोटो पाठवता येतील.
3) मोबाईल वरून काढलेल्या फोटोचे रेसोल्युशन, साईझ आणि क्वालिटी चेक करूनच फोटो सिलेक्ट करण्यात येईल.
4)lensartratnagiri@gmail.com याच मेल आयडी वर फोटो पाठवावेत.
5)1 मार्च पर्यंत सर्वानी फोटो मेल करावेत. 1 मार्च नंतर येणारे फोटो ग्राह्य धरले जाणार नाहीत.
6) फोटो एडिट करताना मूळ विषयात कुठल्याही प्रकारचा बदल केल्यास फोटो ग्राह्य धरण्यात येणार नाही.
7) फोटोवर कुठल्याही प्रकारचा वॉटरमार्क अथवा लोगो नसावा.
8)निवड आणि प्रदर्शनाबाबतचे सर्व हक्क LensArt Core Team आणि लायन्स क्लब कडे राहतील.
9) वरील अटी परिपूर्ण न झालेले फोटो ग्राह्य धरले जाणार नाहीत.
कोणालाही स्पर्धेबाबत काहीही शंका असल्यास अथवा मदत लागल्यास पुढील पैकी कोणाशीही संपर्क साधावा.
पराग पानवलकर : 9422050603
सचिन पानवलकर : 7588918457
उपेंद्र बापट : 9881240824
सिद्धेश वैद्य : 9970245962
लायन्स क्लब, रत्नागिरी
लेन्स आर्ट, रत्नागिरी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here