एसटी संपाबाबत न्यायालयात पुन्हा ५ जानेवारी रोजी सुनावणी

0

◼️ रत्नागिरीत संप मागे घेण्याबाबत उदासीनता

रत्नागिरी : एसटी संपाबाबत पुन्हा न्यायालयाने ५ जानेवारी रोजीची तारीख दिली आहे. बुधवारी बहुतांश कर्मचारी हजर होण्याची शक्यता होती. मात्र, जवळपास १०० कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील इतर आगारांत कर्मचारी हजर होण्याचे प्रमाण वाढत असताना रत्नागिरी आगारात याबाबत अद्यापही एकवाक्यता झाली नसल्याचे एसटी प्रशासनाचे म्हणणे आहे.

बुधवारी संप मागे घेण्यात येईल, अशी सर्वत्र चर्चा होती. मात्र, याला फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी जवळपास १०० कर्मचारी जिल्ह्यातून हजर झाल्याची माहिती एस.टी. प्रशासनाने दिली. रत्नागिरी तालुक्यात संप मागे घेण्याबाबत फार उदासीनता दिसून येत आहे. विभागीय कार्यालय बाहेर एस. टी. कर्मचारी यांचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. संप मागे घेण्यात आले नाही.

दरम्यान, ज्या कर्मचाऱ्यांवर निलंबन तसेच सेवसामाप्ती कारवाई झाली होती असे २५ कर्मचारी बुधवारी हजर झाले. या २५ कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्यात आली असल्याची माहिती एस.टी. प्रशासनाने दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:24 AM 23-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here