‘पृथ्वी गोल नाही’ हे सिद्ध करण्याच्या नादात अंतराळवीराला मुकावे लागले प्राणाला!

0

पृथ्वी गोल हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मात्र पृथ्वी गोल नाही, ही गोष्ट सिद्ध करण्याच्या नादात एका अमेरिकन अंतराळवीराला आपले प्राण गमवावे लागले आहेत. अंतराळवीर माइक ह्युजेसने पृथ्वी गोल नाही हे सिद्ध करण्यासाठी स्वतः एक रॉकेट तयार केले होते. या रॉकेटद्वारे उड्डाण घेतल्यानंतर या रॉकेटचा धमाक्यासह स्फोट झाला व त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना कॅलिफोर्निया येथे घडली. ह्युजेस लिमोजिन ड्रायव्हर देखील होते. त्यांच्या नावावर ‘लाँगेस्ट लिमोजिन रॅप जंप’चा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. वर्ष 2002 मध्ये त्यांनी आपल्या लिमोजिन कारला 103 फूट उंचीवरून उडवले होते. प्रसंगी रॉकेट वरती जाताच त्याचे पॅराशूट फुटते. वाफेवर उडणारे रॉकेट उड्डाण घेते, मात्र 10 सेंकदात पुन्हा पृथ्वीवर कोसळते. सांगण्यात येत आहे की, लाँचिंगच्या वेळी कोणत्यातरी गोष्टीला धडकल्याने पॅराशूटला चिर पडली व त्यामुळे ही घटना घडली.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here