रत्नागिरीत २६ डिसेंबर रोजी बौद्ध वधू-वर पालक मेळावा

0

रत्नागिरी : बुद्धिस्ट सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी महासंघ, रत्नागिरीच्या वतीने बौद्ध समाजातील इच्छुक वधू-वर व पालक यांचा परिचय मेळावा दि. २६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, नरहर वसाहत, शिवाजीनगर, धन्वंतरी हॉस्पिटलजवळ, रत्नागिरी येथे होणार आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे व पश्चिम महाराष्ट्रातील बौद्ध समाज बांधवांसाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील इच्छक प्रथम वर-वधू, घटस्फोटीत व विधर यांनी या मेळाव्यास पालकांसमवेत सहभागी व्हावे, मेळाव्यास येताना पोस्टकार्ड साईज रंगीत फोटो व बायोडाटा आणावा.

अधिक माहितीसाठी गोपीनाथ साळवी, भास्कर कुरतडकर, एम. बी. कांबळे, भार्गव जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:35 PM 23-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here